vijay shivtare about balu khandare | Sarkarnama

बाळू, तुला लोकसभेलाच उभे करायला पाहिजे!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पुण्यात एक विमानतळ असताना तुमच्या मतदारसंघात दुसरे विमानतळ कशाला?

सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज पालकमंत्री विजय शिवतारे यांना आक्षेपांचा सामना करावा लागला.

''केवळ बैठका आणि सभांसाठी साताऱ्यात येऊ नका. साताऱ्यावर मनापासून प्रेम करा',' अशा शब्दांत सातारा पालिकेचे नगरसेवक व नियोजन समितीचे सदस्य बाळू खंदारे यांनी सल्ला दिला.

नगरपालिकांचा विषय बाळू खंदारे हे मांडत असताना पालकमंत्री शिवतारे त्याच्या बोलण्याकडे लक्ष देईनात. त्यामुळे श्री. खंदारे यांनी ''पालकमंत्री साहेब सातारा जिल्ह्यावर प्रेम करा. केवळ बैठका, सभासाठी जिल्ह्यात येऊ नका. मी बोलतोय म्हणून राग मानून घेऊ नका. सातारा जिल्ह्याविषयी तळमळ ठेवा'' असे म्हणत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

'विधानसभेत बोलता पण विदर्भ मराठवाडा च्या अभिनंदनाचा ठराव होत असताना तुम्ही बघ्याची भूमिका का घेता, पुण्यात एक विमानतळ असताना तुमच्या मतदारसंघात दुसरे विमानतळ कशाला', असले भन्नाट सवालही केले.

यावर पालकमंत्री शिवतारे यांनी त्याला तुझे नाव काय असे विचारले, त्यावर खंदारे याने बाळू असे सांगितले. 'बाळू तू जिल्ह्याविषयी बोलतोस तुला लोकसभेलाच उभे करायला पाहिजे', असे म्हणताच सर्वांच्या चेहऱ्यावर हासू उमटले. 

संबंधित लेख