vijay mallya said m not guilty | Sarkarnama

गैरव्यवहारांचे आरोप पूर्णपणे खोटे : विजय मल्ल्या 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

लंडन ः प्रत्यार्पणाच्या संदर्भातील खटल्याच्या सुनावणीवेळी आपले म्हणणे मांडण्यासाठी सध्या लंडनमध्ये असलेला कर्ज बुडवा उद्योगपती विजय मल्ल्या याने वेस्टमिन्स्टर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजेरी लावली.

आपल्या विरोधात ठेवण्यात आलेले गैरव्यवहाराचे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा दावा माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मल्ल्या याने केला. 

मल्ल्या म्हणाला, की या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असून, आता न्यायालयच याबाबत काय तो निर्णय घेईल. माझ्या विरोधात ठेवण्यात आलेले विविध गैरव्यवहारांचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. 

या खटल्याशी संबंधित सर्व कागदपत्रे "सीबीआय'ने न्यायालयात सादर केली आहेत. आयडीबीआय बॅंकेचे उपव्यवस्थापकीय संचालक बी. के. बत्रा यांच्याशी हातमिळवणी करून मल्ल्याने मोठा गैरव्यवहार केल्याचा दावा "सीबीआय'कडून करण्यात आला आहे.

सध्या लंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या मल्ल्या याचे भारताकडे प्रत्यार्पण करावे, अशी मागणीही "सीबीआय'कडून करण्यात आली आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख