Vijay Mallya Arrested in London, gets bail | Sarkarnama

विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक, जामिनावर सुटका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

`किंगफिशर'चा मालक मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी लंडनमध्ये आज अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. गेल्या सहा महिन्यांत मल्ल्या यांना दुसऱयांदा अटक करण्यात आली आहे.

 

पुणे : `किंगफिशर'चा मालक मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी लंडनमध्ये आज अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. गेल्या सहा महिन्यांत मल्ल्या यांना दुसऱयांदा अटक करण्यात आली आहे.

भारतातील विविध बॅंकांची कर्जथकीत ठेवून मल्ल्या यांनी दोन मार्च 2016 रोजी लंडन गाठले. त्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सकडे विविध बॅंकांची नऊ हजार कोटी रुपयांची कर्जे थकीत आहेत. मल्ल्या यांच्या नावावर भारतात अटक वॉरंट निघालेली आहेत. या आर्थिक गुन्ह्यांचा तपास सीबीआय आणि ईडी करीत आहेत. मल्ल्या यांनी त्यांच्यावर असलेले आरोप ट्विटरद्वारे फेटाळले आहेत.

छानछौकी जीवनशैलीसाठी मल्ल्या प्रसिद्ध आहे. ब्रिटनमध्ये ते अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतात. 

 

संबंधित लेख