vidharbha politics | Sarkarnama

विदर्भवाद्यांचे उद्या आंदोलन 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 एप्रिल 2017

विदर्भ राज्याच्या मागणीच्या समर्थनार्थ विदर्भवादी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून काळा दिवस पाळणार आहे. 

नागपूर : विदर्भ राज्याच्या मागणीच्या समर्थनार्थ विदर्भवादी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून काळा दिवस पाळणार आहे. 

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव संमत केला आहे. केंद्रातील भाजप सरकारने तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही कोणतेही पावले उचलली नाहीत. विदर्भ राज्याच्या निर्मितीचा ठराव आणण्यासाठी भाजपचे नेते उत्सुक नसल्याचे स्पष्ट झाल्याने विदर्भवादी नेते व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात विदर्भात एक मे रोजी काळा दिन साजरा केला जाणार आहे. 

नागपुरात प्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर यांच्या "विष्णूजी की रसोई'मध्ये विदर्भाचा ध्वज फडकविण्यात येईल. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात असेच कार्यक्रम केले जाणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी आल्यानंतरही विदर्भाच्या विकासासाठी कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाही. यामुळे महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होणार नाही, हे आता स्पष्ट झाल्याचे व्हीकॅन संघटनेचे नेते ऍड. मुकेश समर्थ यांनी म्हटले आहे. 

याशिवाय विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या इतर संघटनांनीसुद्धा महाराष्ट्र दिनी आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे राम नेवले यांच्या नेतृत्वात नागपुरात आंदोलन केले जाणार आहे. नागपुरातील "विदर्भ चंडिका' पुतळ्याजवळ महाराष्ट्र दिनाला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाणार आहे. 

संबंधित लेख