मुंबईची सत्ता घ्यायला गेले अन्‌ वाचमन झाले : जयंत पाटील 

मुंबईची सत्ता घ्यायला गेले अन्‌ वाचमन झाले : जयंत पाटील 

मुंबई : स्वाभिमानाने वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजायला निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांच्या करवी जीएसटीच वाघाच्या घशात घातली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता घ्यायला गेले अन्‌ वाचमन झाले असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी लगावला. 

विधानसभेत जीएसटी बीलावर चर्चा करताना जयंत पाटील यांनी तुफान टोले बाजी केली. मुख्यमंत्र्यांना उद्देशुन पाटील म्हणाले, "" मुख्यमंत्र्यांचे महापालिका निवडणुकीची भाषणे आठवतात. त्यामुळे ते महापालिकेच्या वाचमनच्या भूमिकेतून जीएसटीवर नुकसान भरपाई देण्या अगोदर महापालिकेचे आँडीट करतील. महापालिका निवडणुकीत भाजपला आशिष शेलारांमुळे यश मिळाले पण प्रसाद मात्र दुसऱ्यांनीच खाल्ला असे सांगत त्यांनी शेलार यांना चिमटे काढले. 

पाटील म्हणाले, "" विधानसभेत आज महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम मांडण्यात आले आहे. या बिलाला "जीएसटी' विधेयक म्हणण्याऐवजी 'मातोश्री' बील म्हणावे. कारण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे बील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जावून मंजूर करून आणले आहे. मुख्यमंत्र्यांना उद्देशुन जयंत पाटील म्हणाले, "" भाजपच्या धोरणात्मक निर्णयामुळे आगामी राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत शिवसेनेला दुखवायचे नाही त्यामुळे तुम्ही अर्थमंत्र्यांनी मातोश्रीवर पाठवले.'' 

शिवसेना आमदारांकडे बोट करत मुख्यमंत्र्यांनी एक फोन मातोश्रीवर केला की वेलमध्ये असलेले आमदार जाग्यावर जातात असे सांगत पाटील यांनी शिवसेना आमदारांनाही चिमटा काढला. ते म्हणाले, "" मुंबई महापालिकेचे होणारे नुकसान भरून देण्यासाठी अर्थमंत्री मातोश्रीवर गेले. अष्टप्रधान मंडळासमोर आपले जीएसटीचे प्रेजेटेशन केले. त्यावेळी मुंबईला नुकसानभरपाई देण्याचे कबूल केले आहे. तुम्ही नुकसान भरपाई देवून उपकार करत नाहीत.'' 

शिवसेनेचे सदस्य सुनील प्रभू यांना उद्देशून पाटील म्हणाले, "" तुम्ही मुंबईत मराठी माणूस टिकवला नाही. किमान मुंबईचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सभागृहात सरकारला धारेवर धराल अशी अपेक्षा होती.'' 
पाटील यांनी आपल्या भाषणात मंत्री गिरीश बापट, रामदास कदम, मंदा म्हात्रे यांनाही चिमटे काढले.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com