vidhan sabha | Sarkarnama

रात्रशाळेच्या शिक्षकांना  सरकारने न्याय द्यावा : कपिल पाटील 

संजीव भागवत: सरकारनामा ब्युरो 
रविवार, 21 मे 2017

मुंबई : केवळ रात्रशाळेत शिकवणाऱ्या अर्धवेळ शिक्षकांना नाममात्र पगार देण्याच्या निर्णयावरून राजकारण पेटले आहे. शालेय शिक्षण विभागाने घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. 

यासंदर्भात पाटील यांच्यासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि इतर चार आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती पाटील यांनी दिली. 

महाराष्ट्रात एकूण 176 रात्रशाळा असून त्यात 30 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 150 रात्रशाळा व ज्युनिअर कॉलेज फक्त मुंबईत आहेत. त्यातील 1010 रात्रशाळा शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. केवळ रात्रशाळेत शिकवणाऱ्या अर्धवेळ शिक्षकांना नाममात्र पगार देण्यात येणार असल्याने आपला याला विरोध असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. 

पाटील यांच्यासोबत डॉ. सुधीर तांबे, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे आणि विक्रम काळे हे शिक्षक आमदार शिष्टमंडळात होते. 
दरम्यान, शिक्षण विभागाने काढलेल्या रात्रशाळेच्या निर्णयाचे राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी व त्यासोबतच विद्यार्थी संघटनांनीही स्वागत केले आहे. जे शिक्षक रातरशाळेत अर्धवेळ काम करत होते त्यांना या निर्णयामुळे पूर्णवेळ वेतन आणि इतर सुविधाही मिळणार आहेत. 

संबंधित लेख