viajay shivtare about maharashtras situation | Sarkarnama

महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश- बिहार होतोय?; शिवसेनेच्या मंत्र्यालाच वाटतेय भीती! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

ही भूमी छत्रपतींची आहे, प्रतीसरकार स्थापन करणाऱ्या नाना पाटलांची आहे, महाराष्ट्राचा मंगल कलश आणणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची आहे. त्यामुळे फक्त राज्यालाच नव्हे तर देशाला प्रेरणा देणारे काम या भूमितून झाले आहे.

- विजय शिवतारे, पालकमंत्री 

सातारा : आजच्या घडीला राज्याची परिस्थिती खूपच विदारक दिसते. बिहार, उत्तरप्रदेश मध्ये ज्यापद्धतीची परिस्थिती आहे तशी या पुरोगामी महाराष्ट्रात होतेय काय, अशी भीती साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केली. 

सातारा नगरपरिषदेने आयोजित केलेल्या हुतात्मा स्मारक नुतनीकरण कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात शिवतारे बोलत होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, आमदार शंभुराज देसाई, नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, स्वातंत्र्य सैनिक सोपानराव घोरपडे, मानसिंगराव शिंदे , पतंगराव फाळके उपस्थित होते. 

शिवतारे म्हणाले, जळगाव जिल्हा जसा केळीचा, नागपूर जसा संत्र्याचा तसा सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हे बिरुद खूप अभिमानास्पद आहे. जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकाना निधी देवून त्याचे नुतनीकरण करुन त्यात वाचनालय, संरक्षक भिंती, गार्डन ही कामी केली आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख