vedantikaraje bhosale | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

अजिंक्‍यतारा संस्थेचे नेतृत्व वेदांतिकाराजेंकडे! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

अजिंक्‍यतारा सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी विक्री संस्थेच्या अध्यक्षपदी सौ. वेदांतिकाराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. सौ. वेदांतिकाराजे या साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी होत.

सातारा : अजिंक्‍यतारा सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी विक्री संस्थेच्या अध्यक्षपदी सौ. वेदांतिकाराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. सौ. वेदांतिकाराजे या साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी होत. 

सातारा पालिका निवडणुकीत नगर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या त्या उमेदवार होत्या. पण त्यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर सौ. वेदांतिकाराजे यांनी अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाचाही राजीनामा दिला होता. पण आता सहकार क्षेत्रातील महत्वाची संस्था असलेल्या अजिंक्‍यतारा सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी विक्री संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे त्या पुन्हा या संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात कार्यरत राहणार आहेत. 

निवडीनंतर बोलताना सौ. वेदांतिकाराजे यांनी संस्थेच्या कामकाजाचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ पुणे यांच्या सहकार्याने अजिंक्‍यतारा फळे, फुले संस्था 7 कोटी 21 लाखांचे अद्यावत शितगृह उभारत आहे. 100 मेट्रीक टन क्षमता असलेले हे शितगृह येत्या दोन- तीन महिन्यात शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. यावेळी संस्थेचे संचालक संजय घोरपडे, कृषीभूषण मनोहर साळुंखे, उद्यानपंडीत प्रभाकर भोसले, दिलीप शेळके, राहुल पवार, नथु कापे, पदमसिंह फडतरे, व्यवस्थापक बाळासाहेब निकम, संजय शिंदे आणि शेतकरी उपस्थित होते. 

संबंधित लेख