VASANT DAWKHARE1S MEMORIAL TO BE BUILT AT HIVARE | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

वसंतराव डावखरेंचे स्मारक त्यांच्या मूळ गावी हिवरे येथे होणार; दोन कोटींची तरतूद

भरत पचंगे
रविवार, 15 एप्रिल 2018

शिक्रापूर : विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांचे स्मृतिस्थळ त्यांच्या मूळ गावी (हिवरे, शिरूर) येथे उभारण्याचा निर्णय झाल असून यासाठी दोन कोटींची विशेष तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांचे पूत्र व आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

शिक्रापूर : विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांचे स्मृतिस्थळ त्यांच्या मूळ गावी (हिवरे, शिरूर) येथे उभारण्याचा निर्णय झाल असून यासाठी दोन कोटींची विशेष तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांचे पूत्र व आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

दिवंगत डावखरे यांचे सर्व मित्रमंडळी या कामी सक्रीय झाले असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सचिव असिम गुप्ता यांचा समावेश असल्याचे निरंजन  डावखरे यांनी सांगितले.
 
हिवरेचे सरपंच, ठाणे महापालिकेचे महापौर ते सलग १८ वर्षे विधान परिषदेच्या उपसभातिपदाचा देशात विक्रम करणारे डावखरे यांनी केला. त्यांचे चार महिन्यांपूर्वी वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. राज्याच्या राजकारणात हटके स्वभावाने सर्वपक्षीय मैत्री जपणारे डावखरे यांचे त्यांच्या मूळ गावात (हिवरे, ता.शिरूर) स्मारक व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी होती. याबाबत त्यांचे चिरंजीव व विधान परिषदेतील आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला. 

डावखरे यांचे मित्र असलेले ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी सर्व संबंधित प्रशासकीय प्रक्रीयांना मार्गदर्शन करुन याबाबत हिवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच माया सुनील जगताप यांच्याकडून आलेला एक बांधकाम प्रस्ताव मंजुर केला. या स्मारकात डावखरे यांच्या आठवणी असलेली छायाचित्रे, वृत्तपत्र कात्रणे, त्यांच्याशी संबंधित आलेले लेखे व पुस्तके तसेच त्यांचा एकूणच कार्यकाल दर्शविणारे साहित्य कलादालन, टाऊन हॉल व ग्रामसचिवालयासह असे या प्रस्तावित केले आहे.

त्याचे संकल्पचित्र बनवून राज्यशासनाकडे सादर केले गेले आहे. याच प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असून त्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने सुचना देवू निधीचीही कार्यवाही केल्याची माहिती आमदार डावखरे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून पुढील वर्षभरात हे काम पूर्ण होईल, असे नियोजन आहे. या कामासाठी जागा निश्चित करण्यात आलेली असून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मंजुर केलेल्या १० लाखांच्या निधीतून होत असलेल्या एका इमारती शेजारीच ही स्मारक इमारत उभी केली जाणार आहे.
 

संबंधित लेख