vasai virar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

वसई विरार महापालिकेत अंदाधुंद कारभार

तुषार खरात : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई : नगर नियोजनाची ऐशीतैशी करून बांधकाम क्षेत्रात अंधाधुंदी माजविलेली वसई-विरार महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची असेल. या महानगरपालिकेविषयी प्रचंड प्रमाणात तक्रारी येत असतात. इतक्‍या तक्रारी अन्य कुठल्याही महानगरपालिकेविरोधात येत नाहीत. त्यामुळे या तक्रारींचा निपटारा करताना आमच्याही नाकीनऊ आल्याची भावना मंत्रालयातील अधिका-यांनी "सरकारनामा"शी बोलताना व्यक्त केली. 

या महानगरपालिकेची स्थापना सन 2009 मध्ये झाली आहे. सुमारे 300 चौरस किलो मीटर क्षेत्रफळात ही महानगरपालिका विस्तारलेली आहे. पण सुरूवातीपासूनच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या क्षेत्रावर नियंत्रण ठेवलेले नाही. विशेषतः बांधकाम क्षेत्रात फार मोठी अंधाधुंदी आहे. वसई -विरारमधील जवळपास 90 टक्के इमारती बेकायदा आहेत. सगळे नियम धाब्यावर बसवून या इमारती बांधण्यात आल्या आहेत. इमारती व त्यातील खोल्यांची कागदपत्रे सर्रासपणे बोगस बनविली जातात. अशी कामे करून देण्यात महानगरपालिकेतील कर्मचारीच आघाडीवर आहेत. 

संबंधित लेख