Varsha Gayakwad finds herself encircled by BJP office bearers | Sarkarnama

वर्षा गायकवाड जेव्हा भाजपच्या चक्रव्यूहात सापडतात  तेव्हा 

 सरकारनामा ब्युरो    
रविवार, 18 जून 2017

राजकारणात वेळेला आणि स्थळाला खूप महत्व असते . वेळ आणि  स्थळ चुकले तर काय होऊ शकते याची प्रचिती आज वर्ष गायकवाड यांना आलेली असणार .        

  मुंबई  : काँग्रेसच्या माजी मंत्री आणि आमदार वर्षा गायकवाड या एका बैठकीसाठी मलबार हिलच्या सह्याद्री अतिथीगृहावर गेल्या असताना त्यांची स्थिती भाजपच्या चक्रव्यूहात  सापडल्यासारखी झाली .

राजकारणात वेळेला आणि स्थळाला खूप महत्व असते . वेळ आणि  स्थळ चुकले तर काय होऊ शकते याची प्रचिती आज वर्ष गायकवाड यांना आलेली असणार .        

सह्याद्री अतिथीगृहावरील या गमतीदार  किश्श्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.   विरोधकाला गोड बोलून संशयाच्या धुक्यात कसे गुरफाटायचे याचा जणू वस्तुपाठच यातून मिळतो .  

त्याचे असे झाले की चर्मकार समाजाच्या प्रश्नावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्षाताईंना बैठकीसाठी बोलावले होते. त्यानुसार वर्षा गायकवाड सह्याद्री विश्रामगृहावर गेल्या . परंतु आपल्या बैठकीच्यावेळीच  अमित शाह यांच्या सह्याद्रीवरच   बैठका होत्या याची बहुदा त्याना कल्पना नव्हती . 

 भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बैठका असल्याने राज्यातील भाजप पदाधिकारी सह्याद्री वर जमले होते . त्यापैकी काहींनी वर्षाताईना गराडा घालून  आपण भाजपात येणार का अशी विचारणा केली .  त्यातील अनेकांनी वर्षाताई कडे पाहून त्यांचे अभिनंदन  केले. आपले भाजमध्ये स्वागत आहे असे  भाजपचे पदाधिकारी बोलू लागल्यानंतर   वर्षाताईंना  भाजपच्या चक्रव्यूहात सापडल्यासारखे वाटले असावे . त्यामुळे त्यांनी हसत हसत तेथून काढता पाय घेतला .   

  वर्षा गायकवाड या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी असून गुजरात राज्याची पक्षाची जबाबदारी त्यांच्याजवळ आहे. गुजरातच्या निवडणूका लांब नाहीत त्यामुळे अमित शाह हे सहयाद्रीवर असताना वर्षा ताई तेथे कशाला गेल्या होत्या अशा  चर्चेला या भेटीच्या स्थळामुळे आणि वेळेमुळे वाव मिळणार असे दिसते . 

संबंधित लेख