वर्धेत स्वाभिमानीसोबत एमआयएम व भारिप-बहुजन महासंघ ? 

वर्धेत स्वाभिमानीसोबत एमआयएम व भारिप-बहुजन महासंघ ? 

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुबोध मोहिते निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या दिमतीला भारिप-बहुजन महासंघ व एमआयएम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत होणार आहे. परंतु त्यांच्यासाठी केवळ हातकणंगले वगळता राज्यात एकही मतदारसंघ दिला जाणार नसल्याचे समजते. या स्थितीत विदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी मैत्रीपूर्ण लढती होणार आहे. यात विदर्भातील वर्धा व बुलडाणा हे दोन मतदारसंघ राहणार आहेत. 

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी वर्धा येथे खेळण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यांचे जनसंपर्क अभियानही सुरू झाले आहे. विदर्भात एमआयएमची फारशी ताकद नसली तरी भारिप- बहुजन महासंघाची मोहिते यांना चांगलीच मदत होऊ शकते. वर्धा, हिंगणघाट व देवळी या परिसरात बऱ्यापैकी व्होट बॅंक आहे. या भरवशावर ते कॉंग्रेस उमेदवाराचे अंकगणित बिघडवू शकतात. 

सुबोध मोहिते यांचे मूळ गाव काटोल तालुक्‍यातील आहे. या तालुक्‍याला लागून असलेले धामणगाव व मोर्शी हे मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात सामील झालेले आहेत. या दोन्ही मतदारसंघात मराठा समाजाचे वर्चस्व असल्याने मोहिते यांना आपण "फाईट'मध्ये राहू, असे वाटत आहे. 

मोहिते यांनीही या आघाडीला दुजोरा दिला आहे.कॉंग्रससोबत चर्चा सुरू आहे. स्वाभिमानी संघटनेने वर्धा व बुलडाणा या मतदारसंघांवर दावा केला आहे. आघाडीत हा मतदारसंघ न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे या मतदारसंघातलढण्याचा विचारकरीत असल्याचे "सरकारनामा'शी बोलताना सुबोध मोहिते यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com