vandana chavan gets nomination for deputy chairmanship | Sarkarnama

वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांचे नाव विरोधी पक्षांकडून  राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आज  निश्चित झाले आहे. या पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने संयुक्त जनता दलाचे खासदार हरिवंश यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या पदासाठी येत्या नऊ आॅगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.

वंदना चव्हाण यांच्या नावाची चर्चा गेल्या पंधरा दिवसांपासून होती. वकील असलेल्या वंदना चव्हाण या दुसऱ्यांदा राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पर्यावरणप्रेमी म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी त्या जवळपास नऊ वर्षे सांभाळत आहेत.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अकाली दल हा या पदासाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराज होता. मात्र भाजपने त्यांची नाराजी दूर केल्याने अकाली दलाची मत हरिवंश यांना मिळू शकतात. राज्यसभेत २४५ खासदार आहेत. त्यामुळे विजयासाठी १२३ मतांची आवश्यकता आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे ११० च्या आसापास संख्याबळ आहे. बिजू जनता दलाने जर काॅंग्रेस आघाडीच्या वंदना चव्हाण यांना पाठिंबा दिला तर त्यांची विजयी होण्याची शक्यता वाढू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे.

तमिळनाडूतील अण्णाद्रमुक, द्रमुक तसेच तेलंगणा राष्ट्रीय समिती, वायएसआर काॅंग्रेस या पक्षांची मते भाजप आघाडीला मिळू शकतात.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख