vajpeyi`s moratal brings at bjp hq | Sarkarnama

वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात! चार वाजता होणार अंत्यसंस्कार

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात सकाळी अकराच्या सुमारास आज आणण्यात आले. त्यांच्या अंतदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, अनेक राज्याचे मुख्यमंत्री जातीने उपस्थित होते.

वाजपेयी यांच्या निवासस्थानापासून हे पार्थिव भाजप मुख्यालयात आणण्यात आले. या वेळी नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या अंत्ययात्रेस सुरवात होणार आहे.  सायंकाळी चार वाजता वाजपेयी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मोदी आणि शहा ये दोघेही येथे बराच वेळ बसून होते. 

संबंधित लेख