vajpeyi speech in belgaon | Sarkarnama

वाजपेयी बेळगावात 'कोंकम'वर बोलले अन टाळ्यांचा गजर झाला! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अटल बिहारी वाजपेयी बेळगावात 2004 ला आले होते. तेथे त्यांची जाहीर सभा झाली. आणि त्या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. निवडणुकीच्या अगोदरची ती सभा आल्यामुळे वाजपेयी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

वाजपेयींनी नेहमी प्रमाणे आपल्या थाटात भाषणाला सुरुवात केली. ते सीमाप्रश्‍नावर बोलतील, असे वाटत होते. पण मुत्सद्दी वाजपेयी यांनी त्याला अतिशय पद्धतशीरपणे फाटा दिला. त्यांनी एक वेगळ्याच मुद्याला हात घातला. ते म्हणाले, "महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमेवर बेळगाव वसले आहे. या भागात तीनही भाषेचा संगम झाला आहे. गोव्यात कोंकणी बोलली जाते. कर्नाटकात कन्नड बोलले जाते. तर महाराष्ट्रात मराठी बोलले जाते.'' हे त्यांनी सांगितल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर नेहमीप्रमाणे एक मोठी पोझ घेत ते पुढे म्हणाले, ""और इसका होता है, कोंकम (कोंकणी, कन्नड, महाराष्ट्र). और कोंकम सस्ता भी आहे, और अच्छा भी है.'' हे सांगितल्यानंतर तर दोन-तीन मिनिटासाठी टाळ्यांचा अखंड गजर झाला. 

संबंधित लेख