vajpai statue in up | Sarkarnama

उत्तर प्रदेशात उभारणार  वाजपेयी यांची स्मारके 

वृत्तसंस्था
रविवार, 19 ऑगस्ट 2018

लखनौ : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक उभारण्याचे नियोजन उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे सरकार करीत आहे, असे शनिवारी सांगण्यात आले. 

वाजपेयी यांच्या मूळ गावात म्हणजे बटेश्‍वर, त्यांचे शिक्षण झालेले कानपूर व जिथून त्यांनी लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा लढविली त्या बलरामपूर व त्यांचा लोकसभा मतदारसंघ लखनौ या चार ठिकाणी स्मारक उभारण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकार तयार करीत आहे. 

वाजपेयी यांची रक्षा उत्तर प्रदेशमधील सर्व नद्यामध्ये विसर्जित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी (ता. 16) केली. दरम्यान, पक्षाचे उपाध्यक्ष जे. पी. एस. राठोड म्हणाले, ""वाजपेयी यांचे वलय एवढे उत्तुंग आहे की, कोणत्याही गोष्टीला त्यांचे नाव दिले तरी ते कमीच ठरणार आहे. भाजपच्या महिला शाखेतर्फे वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कवी संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.  

संबंधित लेख