vajapeyi`s pune visit in 1996 | Sarkarnama

वाजपेयी म्हणाले; मत रोको, बडी तडपी हुई आत्मा है वह आणि लगेच प्रवेश मिळाला

उमेश घोंगडे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

पुणे : गोष्ट 1996 ची. अटलबिहारी वाजेपयी यांची पुण्यात हॉटेल श्रेयसला पत्रकार परिषद सुरू होती. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये काम करणारे एक कर्मचारी मिलिंद रथकंठीवर यांनी वाजपेयी यांचे रेखाचित्र रेखाटले होते. त्यावर अटलजींची स्वाक्षरी घेऊन त्यांना ते भेट द्यायचे होते. मात्र सुरक्षा रक्षक रथकंठीवार यांना त्यांच्यापर्यंत पोचू देईनात काही वेळेनंतर वाजपेयी यांचे लक्ष गेले.

ते म्हणाले, अरे उनको रोको मत बडी तडपी हुई आत्मा है वह' वाजपेयींच्या या वाक्‍यानंतर रथकंठीवार यांना तात्काळ आत प्रवेश मिळाला आणि त्यांना स्वत: रेखाटलेले चित्र वाजपेयी यांना भेट दिले. वाजेपयी यांच्याविषयीची 22 वर्षापूर्वीची आठवण सांगताना रथकंठीवार यांचे डोळे भरून आले. 

1996 च्या लोकसभा निवडणुकीआधी वाजपेयी यांची पुण्यात अलका टॉकीज चौकात सभा होती. वाजपेयी यांचे रेखाटलेले चित्र घेऊन रथकंठीवार सभास्थानी पोचले. मात्र खूप प्रयत्नांनंतरदेखील त्यांना व्यासपीठावर प्रवेश मिळाला नाही.काही वेळानंतर अरविंद लेले यांनी वाजपेयी यांनी उद्या सकाळी हॉटेल श्रेयसला बोलावल्याचा निरोप दिला. त्याप्रमाणे रथकंठीवार दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलवर पोचले. तेथे पत्रकार परिषद सुरू होती.

सुरक्षा रक्षक आत प्रवेश देईनात. काही वेळाने वाजपेयी यांच्या हे लक्षात आले. त्यांनी सुरक्षा रक्षकांना उद्देशून ते म्हणाले, "" अरे उनको रोको मत. बडी तडपी हुई आत्मा है वह'' त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रवेश दिला. वाजेपयी यांनी शेजारच्या खुर्चीवर बसवून घेतले. रथकंठीवार यांनी वाजपेयी यांचे काढलेले रेखाचित्र त्यांच्यासमोर ठेवले. मोठ्या कौतुकाने त्याकडे पाहात बड अच्छा चित्र बनाया है, असे म्हणाले, रथकंठीवार यांनी त्यावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली. वाजपेयी यांनी लगेच स्वाक्षरी केली. वाजपेयींच्या स्वाक्षरीचे ते रेखाचित्र रथकंठीवार यांनी त्यांना भेट दिले. 22 वर्षापूर्वीची ही आठवण सांगताना रथकंठीवार त्या भूतकाळात रमले होते. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख