Vaishali Dakhore MPSC Exam | Sarkarnama

परिस्थितीवर मात करुन वैशाली झाली कर सहायक व मंत्रालय लिपिक परीक्षा उत्तीर्ण

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 मे 2019

प्रबळ इच्छाशक्ती आणि परीश्रम करायची तयारी असेल तर परिस्थिती ध्येयाच्या आड येऊ शकत नाही. तालुक्‍याच्या उडदी येथील वैशाली नारायण डाखोरे या विवाहित तरुणीने गरिब असल्याचे दुःख कवटाळत न बसता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झेप घेतली. तिने कर सहायक व मंत्रालय लिपिक या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. तिच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

पुसद (जि. यवतमाळ) : प्रबळ इच्छाशक्ती आणि परीश्रम करायची तयारी असेल तर परिस्थिती ध्येयाच्या आड येऊ शकत नाही. तालुक्‍याच्या उडदी येथील वैशाली नारायण डाखोरे या विवाहित तरुणीने गरिब असल्याचे दुःख कवटाळत न बसता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झेप घेतली. तिने कर सहायक व मंत्रालय लिपिक या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. तिच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

वैशालीचे प्राथमिक शिक्षण महागाव तालुक्‍यातील हिवरा खुर्द येथे झाले. तिचे लग्न पुसद आगारातील वाहक नारायण डाखोरे यांच्याशी 2014 मध्ये झाले. याच वेळी ती पदवी परीक्षा उत्तीर्ण झाली. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिने स्पर्धा परीक्षेसाठी उडदी येथेच तयारी सुरु केली . घर-संसार सांभाळून नियमितपणे अभ्यास केला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात एकाच वेळी कर सहायक व मंत्रालय लिपिक या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होऊन सर्वांना चकित केले. तिच्या यशाबद्दल सर्वांनी तिचे कौतुक केले. यशाचे श्रेय ती आई-वडील, सासू-सासरे, पती, शिक्षक आणि मित्र परिवाराला देते.

यशाच्या आड गरिबी येऊ शकत नाही. अभ्यास आणि प्रयत्नांची पराकाष्ठा यातून यशोशिखर गाठता येते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी माझे पती नारायण यांनी मला प्रोत्साहन दिले - वैशाली नारायण डाखोरे

संबंधित लेख