घरच्या लोकांना दोन पोळ्या जास्त मिळतात- देवेंद्र फडणवीस

वैजापूर नगरपालिका बहुमताने भाजपच्या ताब्यात द्या, दोन वर्षांत शहरात परिवर्तन घडवून दाखवतो. शेवटी घरच्या लोकांना दोन पोळ्या जास्तच मिळत असतात, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्ष पदासह भाजप राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले.
घरच्या लोकांना दोन पोळ्या जास्त मिळतात- देवेंद्र फडणवीस

वैजापूर: वैजापूर नगरपालिका बहुमताने भाजपच्या ताब्यात द्या, दोन वर्षांत शहरात परिवर्तन घडवून दाखवतो. शेवटी घरच्या लोकांना दोन पोळ्या जास्तच मिळत असतात, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्ष पदासह भाजप राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले.

वैजापूर नगरपालिका निवडणूक प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत भाजपची आघाडी असल्याने फडणवीस यांनी कुणावरही टीका केली नाही. 

केंद्र आणि राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची जंत्रीच त्यांनी वाचून दाखवली. सत्ता हाती दिली तर  पंतप्रधान आवास योजनेसाठी जेव्हढे प्रस्ताव पाठवाल तेवढे मंजूर करतो, कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचा प्रस्ताव पाठवा. तत्काळ निधी देतो, असे आश्वासन दिले.

शेवटी घरच्या लोकांना दोन पोळ्या कधीही जास्त मिळत असतात. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मी निधी देतोच. पण विरोधक माझ्याकडे कोणत्या तोंडाने येणार, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सारवासारव केली.

पाण्यासाठी युद्धासारखी परिस्थिती
वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी उपस्थित केलेल्या हक्काच्या पाण्यावर बोलताना, तुमच्यावर अन्याय
होऊ देणार नाही, असा शब्द मुखमंत्र्यांनी भाषणात दिला. पाण्यासाठी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र यांच्यात युद्धा सारखी परस्थिती निर्माण झाली होती. पण आम्ही मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून दिले.

दमन गंगा, पिंजळी नदीजोड प्रकल्पामुळे पन्नास टिएमसि पाणी गोदावरी खोऱ्यात येणार आहे. त्यामुळे आता भांडणे थांबतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैजापूरकरांना दिला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com