vaibhv naik on rane | Sarkarnama

दोन्ही मुलांमुळेच राणेंची अवस्था वाईट : वैभव नाईक 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

बाबासाहेब पुरंदरे यांनी सर्व गडकिल्ले फिरुन माहिती गोळा केली. परंतु नीतेश राणे यांनी पुरंदरेंना एकटे फिरुन दाखवावे अशी धमकी दिली आहे. मग नीतेश राणेंना आपल्या सोबत फिरताना काळया रंगाचे सफारी कोट घालुन असलेले गार्ड कशासाठी लागतात? असा सवाल करत नितेश राणे, निलेश राणे या दोन मुलांमुळेच नारायण राणेंची वाईट अवस्था झाली असल्याचा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे. 

पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांनी सर्व गडकिल्ले फिरुन माहिती गोळा केली. परंतु नीतेश राणे यांनी पुरंदरेंना एकटे फिरुन दाखवावे अशी धमकी दिली आहे. मग नीतेश राणेंना आपल्या सोबत फिरताना काळया रंगाचे सफारी कोट घालुन असलेले गार्ड कशासाठी लागतात? असा सवाल करत नितेश राणे, निलेश राणे या दोन मुलांमुळेच नारायण राणेंची वाईट अवस्था झाली असल्याचा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे. 

कणकवली येथील विजयभवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख जयेंद्र रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक आदी उपस्थित होते. 

मराठा मोर्चाचे नेतृत्व राणेंकडे समाजाने दिले होते. त्या नेतृत्वाचा वापर स्वार्थासाठी केला जात आहे. राणेंचा भाजप प्रवेश हा दोन्ही मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी आहे. नारायण राणे यांची जी अवस्था झाली आहे. त्याला दोन्ही मुलेच जबाबदार आहेत. राणेंना सतीश सावंत, दत्ता सामंत, रणजीत देसाई यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना आमदारकी देण्यासाठी प्रवेश नसून तो मुलांच्या भवितव्यासाठी असल्याचा टोला आ.वैभव नाईक यांनी लगावला. 

कॉंग्रेसच्या झेंडयाखाली लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद सारख्या निवडणुका लढवून कॉंग्रेसच्या विचारांची मते घ्यायची. त्यानंतर कॉंग्रेसच्याच बैठकांना विरोध करायचा? ही कुठली निती आहे. काही दिवसातच जिल्ह्‌यातील कॉंग्रेस भारतीय जनता पार्टीत विलीन होणार आहे. त्याचा फायदा म्हणजे जिल्ह्‌यातील जनता शिवसेनेला स्विकारणार आहे. कॉंग्रेस आणि भाजप एका नाण्याचे दोन बाजू आहेत. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहे. ज्याठिकाणी गावातील ग्रामस्थ गाव पॅनेल करत असतील त्या ठिकाणी शिवसेनेचा पाठिंबा राहील, असे वैभव नाईक यांनी सांगितले. 

आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या मागे कुठलीही इडीची चौकशी नाही. त्यामुळे ज्यांच्यामागे इडीची चौकशी आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केसरकरांच्या माध्यमातुन जिल्ह्‌याला शिवसेनेचा पालकमंत्री मिळालेला आहे. जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात धडक कारवाई याच पालकमंत्र्यांच्या काळात होत आहे. जिल्ह्याला चांगल्या प्रकारचा निधी दीपक केसरकर यांनी दिलेला आहे. त्यामुळे पालकमंत्री कुठल्याही पक्षात जाणार नाहीत, असेही ते म्हणाले. 
 

संबंधित लेख