urjit patel and rbi | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या वैयक्तिक कारणासाठी पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या आधीचे गव्हर्नर रघुराम राजन यांना मुदतवाढ देण्यावरून त्यावेळी बराच वादंग झाला होता. आता आपला कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने पटेल यांच्या राजीनाम्याचा मुद्दाही चर्चेत येणार आहे. 

खरेतर पटेल यांचा कार्यकाळ सप्टेंबर 2019 पर्यंत होता. मात्र मध्यंतरी रिझर्व्ह बॅंकेकडील राखीव निधीच्या मुद्यावरून आरबीआय आणि अर्थमंत्रालय यांच्यात प्रचंड वादंग झाला होता. रिझर्व्ह बॅंकेची स्वायतत्ता जपली जात नसल्याचा आरोप अनेकांनी यावेळी केला होता. हा वाद त्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. 

संबंधित लेख