स्वतःतील "एव्हरेस्ट' शोधा, यशस्वी जगण्यासाठी सज्ज व्हा...! 

जो जो कुणी माणूस म्हणून जन्माला येतो, त्या प्रत्येकाला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी असते. त्याचा शोध घ्यायला शिका..आपल्यातही एक"एव्हरेस्ट' दडलेला आहे आणि त्याच बळावर आपण यशस्वी जगण्यासाठीची लढाई हमखास जिंकू शकतो...असा मौलिक मंत्र बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता राहुल बोसयांनी दिला.
स्वतःतील "एव्हरेस्ट' शोधा, यशस्वी जगण्यासाठी सज्ज व्हा...!
स्वतःतील "एव्हरेस्ट' शोधा, यशस्वी जगण्यासाठी सज्ज व्हा...!

कोल्हापूर : जो जो कुणी माणूस म्हणून जन्माला येतो, त्या प्रत्येकाला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी असते. त्याचा शोध घ्यायला शिका..आपल्यातही एक
"एव्हरेस्ट' दडलेला आहे आणि त्याच बळावर आपण यशस्वी जगण्यासाठीची लढाई हमखास जिंकू शकतो...असा मौलिक मंत्र बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता राहुल बोस
यांनी दिला. 

आपल्या आजवरच्या प्रवासातील विविध अनुभवांची शिदोरी रीती करताना त्यांनी साऱ्यांचीच मनं प्रज्वलित केली. निमित्त होते, सकाळ माध्यम समूह व शिवाजी
विद्यापीठातर्फे आयोजित डीवायपी ग्रुप प्रस्तुत "ऊर्जा-संवाद ध्येयवेड्यांशी' या कार्यक्रमाचे. दरम्यान, हाऊसफुल्ल गर्दीच्या साक्षीने या कार्यक्रमाला आजपासून शिवाजी
विद्यापीठातील लोककला केंद्रात दिमाखदार प्रारंभ झाला. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी हा संवाद खुलवला. 

राहुल बोस हे अभिनयाबरोबरच विविध सामाजिक कार्यातील "आयडॉल'. कोल्हापूरच्या बाबतीत अभिमानाची गोष्ट म्हणजे डॉ. यशवंतराव थोरात यांचे ते सख्खे भाचे.
त्यामुळेच संवादाला सुरवात करतानाच डॉ. थोरात यांनी त्यांना मराठीत बोलण्याची सूचना केली. मात्र, "एक सालमे पुरी मराठी सिखूंगा और अगले साल मराठीमें
बोलूंगा' अशी ग्वाही राहुल यांनी दिली. त्यातही मामा मुलाखत घेत असल्याचे "सच और सचके बिना कुछ नही कहूंगा' असेही त्यांनी आवर्जून सांगितले आणि
त्यानंतर तब्बल सत्तर मिनिटे हा संवाद रंगला. राहुल म्हणाले, ""पडद्यावरचा आणि वास्तवाला हिरो हे नक्कीच वेगळे असतात. मात्र, आपण ज्यावेळी एक विशिष्ट
भूमिका घेऊन कार्यरत असतो. त्यावेळी तीच सर्वोत्तम केली पाहिजे. "स्टार आणि ऍक्‍टर' यामध्येही बराच फरक असतो. केवळ स्टार म्हणून प्रसिद्धी मिळवणारे भरपूर
आहेत. पण, "ऍक्‍टर' म्हणून ओम पुरी, नसरूद्दीन शहा आणि "स्टार व ऍक्‍टर'चा सुवर्णमध्य साधणाऱ्या आमीर खान यांच्या भूमिका पहायलाच हव्यात. बॉलीवूडमध्ये
मुख्य प्रवाहात येऊन भूमिका करण्यात फारसे स्वारस्य नसल्यामुळे आणि जे मनाला पटेल तेच करण्याची जिगर असल्याने आर्टफिल्मवर अधिक भर दिला आणि
त्या यशस्वीही झाल्या.'' 

आदिवासी भागातील तेरा वर्षीय पूर्णा मलावत जिगर पणाला लावते आणि एव्हरेस्ट सर करते, ही एक नक्कीच प्रेरणादायी खरी घटना आहे. "लडकिया सब कुछ कर
सकती है' हा या घटनेतील मेसेज मला महत्त्वाचा वाटला आणि "पूर्णा' हा चित्रपट तयार केला. तो 31 मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार असून तो सर्वांनी नक्कीच पहावा,
असे आवाहनही त्यांनी केले. देशाच्या रग्बी संघातून भारताचे प्रतिनिधित्व केले. खेळताना सहा मित्रांनी कित्येकदा मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. जिवाला जीव देणारे
चार बालमित्र आहेत आणि कुटुंबीयांकडून मिळणारे भरभरून प्रेम यांचे खमके पाठबळ असल्यानेच अजून तरी विवाहाचा विचार केला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
एकूणच या साऱ्या संवादात राहुल यांच्या बालपणापासून ते "शेक्‍सपिअर', "हेल्मेट'पर्यंतच्या विविध प्रेरणादायी गोष्टींवर सविस्तर विवेचन झाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com