uplai-budruk-sawant-family-helps-maratha-youths | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या युवकांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी आमदार तानाजीराव सावंतांचा पुढाकार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी लाखो मोर्चे काढले. तरीदेखील सरकारने आरक्षण जाहिर न केल्याने परिस्थीतने हतबल झालेल्या काही युवकांनी आत्महत्या केल्या. शहिद झालेल्या या युवकांच्या घरची परिस्थिती सध्या हलाखीची असल्याचे लक्षात घेऊन युवकांच्या कुटुंबाच्या मदतीला माढा तालुक्यातील सावंत कुटूंबांने आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. 

उपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापूर) : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी लाखो मोर्चे काढले. तरीदेखील सरकारने आरक्षण जाहिर न केल्याने परिस्थीतने हतबल झालेल्या काही युवकांनी आत्महत्या केल्या. शहिद झालेल्या या युवकांच्या घरची परिस्थिती सध्या हलाखीची असल्याचे लक्षात घेऊन युवकांच्या कुटुंबाच्या मदतीला माढा तालुक्यातील सावंत कुटूंबांने आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. 

भैरवनाथ शुगरच्या वतीने मराठा आरक्षणासाठी ३७ शहीद झालेल्या युवकांच्या कुटूंबाला प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय भैरवनाथ शुगरचे चेअरमन आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला आहे. त्यानुसार शहीद झालेल्या प्रत्येक युवकाच्या कुटूंबाला प्रत्येकी एक लाखाचा धनादेश दिल्याची माहिती भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिली.

संबंधित लेख