आघाडी सरकारने मराठा युवकांसाठी दमडीही खर्च केली नाही : देवेंद्र फडणवीस
मुंबई : " गेल्या चार वर्षात सोळा हजार गावे दुष्काळमुक्त केली. मराठा समाजातील युवकांच्या कल्याणासाठी गेल्या सरकारने एक दमडी खर्च केली नव्हती. मात्र आपले सरकार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून देणार आहे.'' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे आदी उपस्थित होते.

सरकारने केलेली कामे घराघरात आणि मनामनात पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री म्हणाले,"" गेल्या चार वर्षात ग्रामीण भागात तीस हजार किलोमीटरचे रस्ते भारले गेले. ते जागतिक दर्जाचे असल्याचे जागतिक बॅंकेने सांगितले आहे तसेच सिंचनावर चार वर्षांत तीस हजार कोटी खर्च झाले आहेत. तेरा लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. शिक्षण क्षेत्रात 18 व्या क्रमांकावरचा महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, महिलांवरील खर्च चार वर्षांत सराकरने चार हजार पटींनी वाढला. ''
दानवे म्हणाले, की भाजपला देशामध्ये आणि राज्यामध्ये सर्वाधिक यश मिळाले आहे. विरोधकांच्या प्रचाराला जनतेने दाद दिलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी आता लोकांना संभ्रमात टाकायचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे ते खोटेनाटे आरोप करत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विचलित न होता विकासाच्या अजेंड्यावर ठाम रहावे.
राज्यातील 91 हजार बूथपैकी बहुतेक बूथमध्ये भाजपाची संघटनात्मक यंत्रणा निर्माण झाली आहे. बूथ रचनेच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधून संघटनात्मक बळाच्या जोरावर भाजपा विजयी होईल. 2019 च्या आगामी निवडणुकीत भाजपा 2014 पेक्षा जास्त यश मिळवेल असा दावाही दानवे यांनी यावेळी केला.
यावेळी भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री वी. सतीशजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचीही भाषणे झाली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहणारा शोकप्रस्ताव मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. गेल्या वर्षभरात निधन झालेल्या विविध मान्यवरांना श्रद्धांजली वाहणारा शोक प्रस्ताव प्रवक्ते विश्वास पाठक यांनी मांडला. आशिष शेलार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी
सुत्रसंचालन केले.