unrest in shrigonda bjp | Sarkarnama

श्रीगोंदेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या पायघड्या

संजय आ. काटे
शनिवार, 12 जानेवारी 2019

भाजपातील नाराजी उघड होत आहे.

श्रीगोंदे (नगर) : श्रीगोंदे नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी देताना पक्षाच्या निष्ठावंतांना डावल्याने भाजपमधील अनेकांनी बंडखोरी केली आहे.

श्रीगोंदे पालिका निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर भाजपातील नाराजी पुढे आली. अर्थात काँग्रेस आघाडीतही नाराजी आहे, मात्र ती उफाळण्यापुर्वी दडपण्याची त्यांची व्यूव्हरचना सध्यातरी यशस्वी झाली आहे. मात्र भाजपातील नाराजी उघड होत आहे.

भाजपाच्या महिला आघाडी शहराध्यक्ष जयश्री कोथिंबीरे यांनी जाहीरपणे पक्षाच्याविरोधात भुमिका मांडली. त्यांना ज्या प्रभागात उमेदवारी करायची होती तेथे त्यांना डावलल्याने त्यांनी नगराध्यक्षपदासह प्रभागातही उमेदवारी दाखल करीत उघड बंडखोरीचा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या, की पक्षाचे निष्ठावंताना डावलून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भाजपाची उमेदवारी दिल्या आहेत. हे पक्षाच्या तत्वाविरोधात आहे.

खासदार दिलीप गांधी समर्थक गोरख आळेकर यांनाही डावलल्याने त्यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी पत्नीचा अर्ज ठेवत पक्षाच्या नेत्यांना लक्ष करणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयात सुरू केल्या आहेत.

गेली चाळीस वर्षे पक्षासोबत असणाऱ्या जेष्ठ नेते दत्तात्रेय हिरनवाळे त्यांच्या पत्नी अथवा सुनेला प्रभागात उमेदवारी मागत होते. त्यांनाही डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी थेट वरिष्ठांकडे नाराजी प्रकट करीत बंडाची तयारी सुरु केली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख