undalkar supporter connect with bjp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

कऱ्हाड दक्षिणेत भाजपचा 'बिमोड' आणि उत्तरेत 'कमळा'ला खतपाणी!

सचिन शिंदे 
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

उत्तरेत भाजपची ताकद वाढू लागली आहे.

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जातीयवादी पक्षाचा बिमोड करण्याचा नारा देणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पूर्णपणे भाजपकडे झुकले आहेत. उत्तरेत भाजपची ताकद वाढू लागली आहे. 

कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघात नेतृत्व करताना माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांनी कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघातही गट बांधणी केली. उत्तरेतील काकांचा गट विधानसभेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही निर्णायक ठरला. नेहमीच बेरजेचा विचार करत कऱ्हाड दक्षिणसह उत्तर मध्येही आपली भुमिका काय असणार याची काळजी घेत त्यांनी गट वाढविला. 2004, 2009 व 2014 च्या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसून आला. 2014 ला श्री. उंडाळकर यांचा पराभव झाला. त्यानंतर मात्र त्यांची कऱ्हाड उत्तरेतील पकड ढिली झाली. आता त्यांनी कऱ्हाड दक्षिणमध्ये लक्ष घालून तेथे गट बळकट करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे त्यांचे उत्तरच्या गटाकडे दुर्लक्ष झाले आहे. 

भाजप जातीयवादी पक्ष हरला पाहिजे, तो समाजात दूही निर्माण करतो आहे, अशी जाहीर भुमिका घेणाऱ्या उंडाळकर यांच्या कऱ्हाड उत्तरमधील कार्यकर्त्यांसह पहिल्या फळीतील नेतेही भाजपच्याच संपर्कात आहेत. मसूर, पाल, उंब्रज, चोरे, कोपर्डे हवेलीसह अनेक गावात काका गट आहे. त्या गटातील बहुतांशी कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तरेतील काका गटाशी संपर्क वाढविला आहे. त्यांनी प्रत्येकाशी वैयक्तिक संपर्क साधून ती किमया साध्य केली आहे. भाजप तर्फे मनोज घोरपडे जरी जाहीर झाले असले तरी धैर्यशील कदम यांच्याशीही त्यांनी संपर्क वाढविला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यापैकी एकाला काका गट पाठिंबा देऊन भाजपच्या वाटेवर निघाला आहे.  

संबंधित लेख