Unable to build toilet then sell your wife Aurangabad collector | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

शौचालय बनवता येत नसेल  तर पत्नीला विका' - जिल्हाधिकाऱयांचा अजब सल्ला

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

औरंगाबाद (बिहार)   : "तुम्ही तुमच्या बायकोसाठी घरामध्ये शौचालय बनवू शकत नसाल, तर तिला विकून टाका,' असे वादग्रस्त वक्तव्य बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी "स्वच्छ भारत अभियाना'च्या प्रचारासाठी सरकारी अधिकारी काम करत असताना बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील जामहोर गावात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी कंवल तनूज यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी चक्क पत्नीसाठी शौचालय बनवू शकत नसल्यास तिलाच विकण्याचा अजब सल्ला गावकऱ्यांना दिला.

 तनूज म्हणाले, की घरात शौचालय नसल्यामुळे स्त्रियांना उघड्यावर शौचाला जावे लागते. त्यामुळे महिलांना त्रासाला समोर जावे लागते. अनेकदा त्यांच्यासोबत बलात्कारासारखे प्रसंग घडतात. शौचालय उभारण्यासाठी फक्त 12 हजार रुपये खर्च आहे. पत्नीच्या प्रतिष्ठेपुढे 12 हजार रुपयांची काय किंमत आहे? केंद्र सरकार घरात शौचालय बांधण्यासाठी मदत देऊ करत आहे; पण तुमच्या घरात शौचालय बांधण्याची मानसिकताच नसेल, तर पत्नीला विकून टाका. 

तनूज यांच्या या वक्तव्यामुळे समाजवादी पक्षाकडून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
संबंधित लेख