उल्हासनगरची सत्ता : ऑल इन द कलानी फॅमिली  

उल्हासनगर आणि कलानी घराणे हे एक राजकीय समीकरणच बनले आहे.
Kalani-Family.
Kalani-Family.

उल्हासनगर  : उल्हासनगर आणि कलानी घराणे हे एक राजकीय समीकरणच बनले आहे. राज्याच्या राजकारणात पप्पू कलानी यांची इमेज नकारात्मक राहिली आहे पण उल्हासनगरात त्यांचा राजकीय प्रभाव गेल्या ३० वर्षांपासून कायम राहिला आहे .

त्यामुळे उल्हासनगरच्या सत्तापदांचा जेंव्हा जेंव्हा विषय समोर येतो तेंव्हा पक्ष भले वेगवेगळे असोत पण सत्तेची पदे  मात्र ' ऑल  इन द कलानी फॅमिली'  असेच चित्र पाहावयास मिळते . मग ते आमदार पद  असो की महापौर पद असो त्यापुढे कलानी हे नाव लागलेच पाहिजे असा प्रयत्न कलानींचा  असतो . 

1986 पूर्वी कलानी परिवारातील काही जण नगरसेवक राहिले.मात्र पप्पू कलानी यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर त्यांनी प्रथम नगराध्यक्ष पद भूषविले.त्यानंतर पप्पू कलानी आमदार तर त्यांची पत्नी ज्योती कलानी आधी नगराध्यक्षानंतर महापौर झाल्या . 

मात्र 1996 साली महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर हे समीकरण बदललं.पप्पू कलानी जरी आमदार असले तरी,त्यांच्या परिवारातील कुणी 10 वर्षाचा तप उलटून गेल्यावरही महापौर पदावर नव्हते.2005 मध्ये पप्पू कलानी आमदार तर त्यांची पत्नी महापौर होते.2009 मध्ये पप्पू कलानी यांची आमदारकी देखील गेली. महानगरपालिका मध्ये शिवसेना-भाजपा-साईपक्ष अशी सत्ता आल्याने उल्हासनगरातील सत्ताकरण प्रथमच कलानी परिवराशिवाय असे चित्र निर्माण झाले.

मात्र आता ज्योती कलानी आमदार आणि त्यांची सून पंचम कलानी महापौर आहेत.यानिमित्ताने कलानी परिवाराने एक अनोखा इतिहास  रचला आहे.

1986 पूर्वी कलानी परिवारातील दुनिचंद कलानी,परसराम कलानी,नारायण कलानी हे काँग्रेसचे नगरसेवक होते.मात्र त्यांच्या घराण्यातील कुणी नगराध्यक्ष वा आमदार पदावर नव्हते.पण त्यानंतर विशेषतः सिंधी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले पप्पू कलानी यांनी राजकारणात प्रवेश केला.बहुमताने काँग्रेस आल्यावर कलानी नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले.

अडीच वर्षे पप्पू कलानी व त्यानंतरचे अडीच वर्षे गोप बेहरानी असा करार झाला होता.मात्र पप्पू कलानी यांनी गनिमीकावा ची खेळी करताना गोप बेहरानी यांना दूर ठेवून नगराध्यक्षपद स्वतःकडेच ठेवले.1991 साली पप्पू कलानी हे आमदार झाल्यावर त्यांची पत्नी ज्योती कलानी ह्या नगराध्यक्षा-स्थायी समिती सभापती या दोन्ही पदावर विराजमान झाल्या.याच दरम्यान पप्पू कलानी यांना रिक्षा युनियनचे अध्यक्ष मारुती जाधव यांच्या खून प्रकरणात अटक झाली.

1996 साली नगरपरिषदचे रूपांतर महानगरपालिका मध्ये झाल्यावर शिवसेना-भाजपाने युती करून सत्ता काबीज करून कलानी परिवाराला पायउतार केले. 2002 मध्ये पप्पू कलानी यांना जामीन मिळाल्यावर त्यांनी राष्ट्रवादीची एकछत्री सत्ता आणली.पुन्हा कलानी आमदार तर त्यांची पत्नी ज्योती कलानी महापौर-स्थायी समिती सभापती झाल्या.

एकाच घरात आमदार-नगराध्यक्ष-स्थायी समिती सभापतीपद असल्यामुळे कलानीचे कट्टर समर्थक साई बलराम,जीवन इदनानी,किशोर वनवारी,अंकुश म्हस्के,डॉ.महेश गावडे,अरुण आशान,विनोद ठाकूर,सुभाष मनसुलकर,सुनील गंगवानीआदींनी कलानी पासून वेगळे होऊन गंगाजल फ्रंट(आताचा साई पक्ष) स्थापन केली. आणि 2007 ची पालिका निवडणूक लढववून शिवसेना-भाजप यांच्यासोबत युती करून लिलाबाई आशान यांना महापौर पदावर विराजमान केले.पुन्हा कलानी परिवाराचा सत्तेतून पायउतार झाला.

2009 मध्ये आमदारकीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा-साईपक्ष एकवटवल्याने पप्पू कलानी यांचा पराभव झाला.आणि भाजपाचे कुमार आयलानी आमदार झाले.2012 मध्ये पुन्हा शिवसेना-भाजपा-साईपक्ष यांच्या सत्तेची पुनरावृत्ती झाली.

2014 च्या आमदारकीच्या निवडणुकीपूर्वी पप्पू कलानी यांना इंदर बठीजा यांच्या हत्ये प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.त्यावेळी त्यांचे पुत्र ओमी कलानी यांनी राजकारणाची सूत्रे हाती घेतली.आणि ज्योती कलानी यांना आमदार म्हणून निवडून आणले.पोटनिवडणुकीतही बाजी मारली.

आणि 2017 च्या पालिका निवडणुकीपूर्वी टीम ओमी कलानी ची निर्मिती करून भाजपाच्या तिकिटावर अधिकांश नगरसेवक निवडून आणले.प्रथम भाजपाच्या मीना आयलानी यांनी महापौर पद भूषवले.आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरही त्या राजीनामा देत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे साकडे घालून पंचम कलानी यांना महापौर करण्याची भूमिका ओमी कलानी यांनी निभावली. 

सुरवातीला शिवसेनेशी साईपक्षाच्या 7 नगरसेवकांनी हातमिळवणी करून ज्योती बठीजा यांना उभे  केल्याने पंचम कलानी यांचे महापौर पदाचे भंगणार की काय अशी शक्यता निर्माण झाली होती.अशा वेळी कमांडर ठरलेले रवींद्र चव्हाण मास्टरमाइंडची भूमिका निभावणारे ओमी कलानी,जीवन इदनानी,प्रकाश माखिजा,राजेश वधारिया,जमनादास पुरस्वानी,सुमित चक्रवर्ती एकवटले आणि महापौर पंचम कलानी ह्या बिनविरोध महापौरपदी निवडून आल्या.

त्यामुळे सासू ज्योती कलानी आमदार आणि सून पंचम कलानी महापौर असे चित्र उल्हासनगरातील आहे.इथे जेंव्हा राष्ट्रवादीचे गटनेते भारत गंगोत्री यांनी ज्योती बठीजा यांना मतदान करण्याचा व्हीप जरी केला.

तेंव्हा ज्योती कलानी यांनी वरीष्टांकडे हा व्हीप रद्द करण्याचे साकडे घातल्याने व्हीप रद्द करून तटस्थ राहण्याचे आदेश वरिष्ठां कडून देण्यात आले.विशेष म्हणजे ज्योती कलानी ह्या राष्ट्रवादीच्या आमदार असतानाही त्यांनी भाजपात असलेल्या सूनबाई पंचम कलानी यांच्यासाठी मोलाचा रोल निभावल्याने पंचमच्या गळ्यात महापौरांची माळ पडली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com