Udyanraje's supporters Ransacked Actors Car | Sarkarnama

साताऱ्यात फक्त उदयनराजेंचेच चालते....समर्थकांनी फोडली हिरोची गाडी 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

फाइट या चित्रपटाची माहिती देण्यासाठी साताऱ्यातील राधिक पॅलेस हॉटलेमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक जिम्मी मोरीया, निर्माता ललित ओसवाल व अभिनेता जीत मोरे, अभिनेत्री सायली जोशी उपस्थित होते. पत्रकार परिषद सुरू असताना हॉटेलजवळ लावलेली जीत मोरे याची कार खासदार उदयनराजे समर्थकांनी फोडली.

सातारा : फाइट या चित्रपटातील हिरोच्या तोंडी साताऱ्यात फक्त माझेच चालते...हा डायलॉग आहे. हा डायलॉग उदयनराजे समर्थकांना रूचला नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आज अभिनेता जीत मोरे यांची गाडी फोडली. 

फाइट या चित्रपटाची माहिती देण्यासाठी साताऱ्यातील राधिक पॅलेस हॉटलेमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक जिम्मी मोरीया, निर्माता ललित ओसवाल व अभिनेता जीत मोरे, अभिनेत्री सायली जोशी उपस्थित होते. पत्रकार परिषद सुरू असताना हॉटेलजवळ लावलेली जीत मोरे याची कार खासदार उदयनराजे समर्थकांनी फोडली. या प्रकारामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला. तसेच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. 

या चित्रपटात हिरो जीत मोरेच्या तोंडी साताऱ्यात फक्त माझेच चालते...असा डायलॉग आहे. तो उदयनराजे समर्थकांना रूचला नाही. त्यामुळे त्यांनी जीत मोरेची गाडी फोडून साताऱ्यात फक्त उदयनराजेंचे चालते, असे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी उदयनराजे समर्थकांनी साताऱ्यात फक्त उदयनराजेंचे चालते. तो डायलॉग चित्रपटातून काढून टाकावा अन्यथा हा सिनेमा आम्ही चालून देणार नाही. चित्रपट चालून देणार नाही, असा दमही भरला आहे. 

संबंधित लेख