Udyanraje Says Dolby must be played in Ganeshotsav | Sarkarnama

कोण म्हणतंय डाॅल्बी वाजवू नका - डाॅल्बी वाजलीच पाहिजे - उदयनराजेंचा नांगरे पाटलांना टोला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

एकीकडे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी आवाजाच्या भिंती मुक्त गणेशोत्सव साजरा करा, असा सल्ला मंडळांना दिला असतानाच साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र, डाॅल्बी कशी वाजत नाय...वाजलीच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. 

सातारा : एकीकडे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी आवाजाच्या भिंती मुक्त गणेशोत्सव साजरा करा, असा सल्ला मंडळांना दिला असतानाच साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र, डाॅल्बी कशी वाजत नाय...वाजलीच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. 

साताऱ्यातील एका गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती आगमनाच्या मिरवणूकीत मुंबईतील एक प्रसिध्द बेंजो वाद्य वाजविण्यात आले. या कार्यक्रमाला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी ''डाॅल्बी कशी वाजत नाही...कोण म्हणतंय वाजवू नका. 23 ला बघू, काय होतयं आणि काय नाय ते. कसे होत नाय. आवाजाच्या भिंतीतर वाजल्याच पाहिजेत आणि कशा वाजत नाहीत...वाजल्याच पाहिजेत,'' अशी भूमिका घेतली. त्याला उपस्थित गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत प्रतिसाद दिला. त्यामुळे गणेश विसर्जनावेळी मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांचे ऐकणार की उदयनराजेंचे हा प्रश्‍न आता पडला आहे. 

 

संबंधित लेख