udyanraje reply to ncp mla | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

त्यांनी संडासच्या उद्‌घाटनासाठी बोलवले तरी जाईन : उदयनराजे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 मे 2018

"राष्ट्रवादीच्या आमदारांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दांडी मारली, मात्र मी सर्वांना निमंत्रण दिले होते. लोकशाहीतील सर्व आमदार राजे आहेत. व्यक्तीस्वातंत्र्य आहे त्यामुळे मी त्यांना येण्यासाठी फोर्स करु शकत नाही. राजेशाही असती तर त्यांना आलेच पाहिजे म्हणून सांगितले असते,' या शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्‍त केली. 

कऱ्हाड : "राष्ट्रवादीच्या आमदारांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दांडी मारली, मात्र मी सर्वांना निमंत्रण दिले होते. लोकशाहीतील सर्व आमदार राजे आहेत. व्यक्तीस्वातंत्र्य आहे त्यामुळे मी त्यांना येण्यासाठी फोर्स करु शकत नाही. राजेशाही असती तर त्यांना आलेच पाहिजे म्हणून सांगितले असते,' या शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्‍त केली. 

कऱ्हाड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार उपस्थित असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी कार्यक्रमाला दांडी मारली होती. त्यासंदर्भातील प्रश्नावर खासदार भोसले म्हणाले, मी सर्व आमदारांना निमंत्रण दिले होते. मात्र ते मला कार्यक्रमाचे निमंत्रणच देत नाहीत. लोकशाहीतील सर्व आमदार राजे आहेत. व्यक्तीस्वातंत्र्य आहे त्यामुळे मी त्यांना येण्यासाठी फोर्स करु शकत नाही. राजेशाही असती तर त्यांना आलेच पाहिजे म्हणुन सांगितले असते, ते निमंत्रण देत नाहीत. त्यांनी संडासच्या उदघाटनासाठी बोलवले तरी मी जाईन. 

संबंधित लेख