udyanraje reply narendra patil | Sarkarnama

दहशत असती तर उमेदवारी अर्जही भरु दिला नसता: उदयनराजे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 एप्रिल 2019

ते माझ्या योग्यतेचे नाहीत.

तांबवे (ता. कऱ्हाड, जि. सातारा): माझ्या खासदार निधीतून 25 कोटी 26 लाख रुपये  विकासासाठी खर्च केला आहे. त्याचा पुरावा मी येथे देत आहे. माझी दहशत असतीतर तुम्हाला उमेदवारी अर्जही भरु दिला नसता, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र पाटील यांना लगावला. 

राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ तांबवे गटातील कार्यकर्त्यांच्या वसंतगड (ता.कऱ्हाड) येथील सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील,  हिंदूराव पाटील, युवानेते सत्यजितसिंह पाटणकर, संतोष कुंभार, धनंजय ताटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

उदयनराजे म्हणाले, विरोधकांनी प्रचारासाठी 90 छोटे हत्ती आणले आहेत. त्यातील 10 ते 15 छोटे हत्ती बाहेर काढले आहेत. छोटे हत्ती कधी बाहेर काढतायत त्याच्यावरच माझेही लक्ष आहे. बघू या मिशीवर किती पीळ मारतायत.स्वतः आमदार असताना माझ्या निधीतून गावात विकासकाम केले आहे. तेव्हा तुम्ही काय केलं स्वतःच्या भागासाठी, गावासाठी ते सांगा. किती वाहने आणायची, खर्च किती करायचा याचा काही अजेंडा त्यांच्याकडे नाही, त्यामुळे ते माझ्या योग्यतेचे नाहीत, केवळ बेताल वक्तव्ये करत आहेत.  

संबंधित लेख