udyanraje in ramoshi morcha | Sarkarnama

उदयनराजे बेरड, रामोशी मोर्चात ! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 जुलै 2017

अखिल महाराष्ट्र बेरड, बेडर, रामोशी समाज कृती समितीने विविध मागण्यांसाठी आज (शुक्रवारी) हुतात्मा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. या मोर्चात खासदार उदयनराजे सहभागी झाले होते. 

सातारा : अखिल महाराष्ट्र बेरड, बेडर, रामोशी समाज कृती समितीने विविध मागण्यांसाठी आज (शुक्रवारी) हुतात्मा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. या मोर्चात खासदार उदयनराजे सहभागी झाले होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर उदयनराजे भोसले तेथे आले आणि आंदोलकांशी संवाद साधला. ते म्हणाले ""समाजासाठी जे जे म्हणून करावे लागेल ते मी करीन. तुम्ही फक्त सांगायचे आणि मी करायचे, बस्स.'' त्यावेळी अखिल महाराष्ट्र बेरड, बेडर, रामोशी समाज कृती समितीचे अध्यक्ष दौलत शितोळे आनंदबापू चव्हाण, नितीन शिंदे, शांताबाई खोमणे, मोहन मदने, बबनराव खोमणे, राजेंद्र बोडरे आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख