udyanraje question vishvas nangare patil | Sarkarnama

नांगरे पाटील तुम्हीच सांगा, 'सनबर्न'चा आवाज किती डेसीबल होता?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

साताऱ्यातील गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्न तत्कालीन एसपी संदीप पाटील यांनी पोलिस प्रशासनाच्या मालकीचा रिसालदार तळ्यात परवानगी देऊन सोडविला होता. पण त्यांची बदली झाली आणि नवीन आलेल्या एसपीनी आपली पॉवर दाखविण्यासाठी हा स्टंट केला आहे. मुळात गणेश विसर्जनात राजकारण आणले गेले आहे, असे ही खासदार उदयनराजे यांनी स्पष्ट केले. 

सातारा : पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत सनबर्न फेस्टिव्हल झाला, त्यावेळी वाद्य वाजविली गेली त्याचा आवाजाचा किती डेसीबल होता, हे नांगरे-पाटील यांना दिसले नाही का? असा प्रश्न करून तेथे चालते मग येथे का नाही, असा प्रश्न साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

 गणेशोत्सवात आवाजाच्या भिंतीबाबत शासनाने मध्यस्थाची भुमिका घ्यावी, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. साताऱ्यात आवाजाची भिंत वाजली तर कारवाई करू, असे विधान कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. यावर उदयनराजेंनी मला अटक करायचं सोडून द्या, असा टोला त्यांनी नांगरे-पाटील यांना लगावला. आवाजाच्या भिंतीवरील बंदीमुळे राज्यातील व्यवसायिक कर्जबाजारी झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे याबाबत शासनाने मध्यस्थाची भुमीका घेऊन मार्ग काढला पाहिजे.

पुणे ग्रामीण हा भाग विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे येतो. त्याठिकाणी सनबर्न फेस्टिव्हल झाला, त्या कार्यक्रमात वाद्य वाजविली गेली त्याचा आवाजाचा किती डेसीबल होता, हे नांगरे-पाटील यांना दिसले नाही का? असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, आवाजाच्या भिंती वाजविणार असे मी म्हटलं आहे. त्यावर नांगरे-पाटील यांनी कारवाई करू असे म्हणाले. मला अटक करायचं वगैरे सोडून द्या, असा प्रतिटोला त्यांनी नांगरे-पाटील यांना लगावला.

 

संबंधित लेख