udyanraje on pratapgad | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

भवानी मातेच्या दर्शनासाठी उदयनराजे प्रतापगडावर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

भवानी मातेची आरती त्यांच्या हस्ते झाली. 

सातारा : नवरात्र उत्सव सुरू असल्याने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज प्रतापगडावर जाऊन राजघराण्याचे कुलदैवत असलेल्या भवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते आरती ही करण्यात आली.

सध्या सातारा लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि उदयनराजे भोसले यांच्यात शीत युध्द सुरू आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या घडामोडीत उदयनराजेंना एकटे पाडण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. त्यामुळे त्यांनी नुकतीच त्यांच्या समर्थकांची जलमंदीर या निवासस्थानी बैठक घेऊन आगामी वाटचाली बाबत चर्चा केली. 

 

दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज त्यांनी प्रतापगडावर जाऊन राजघराण्याचे कुलदैवत असलेल्या भवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत मोठ्यासंख्येने त्यांचे समर्थक व निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते. भवानी मातेची आरतीही त्यांच्या हस्ते झाली. 

यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता ते म्हणाले, प्रत्येकवर्षी मी प्रतापगडावर भवानी मातेच्या दर्शनासाठी येत असतो. त्यानुसार यावेळेसही आलो आहे. हे आपल्यासर्वांचे श्रध्दास्थान आहे. पण सध्या पावसाने दडी मारल्याने या वर्षीच्या दुष्काळ भिषण असणार आहे. त्यामुळे या दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती जिल्ह्यातील जनतेला दे. काहीही करून पाऊस पडु देत, असे साकडे त्यांनी भवानीमातेच्या चरणी घातले.  

संबंधित लेख