उदयनराजे हे सौरभ राव यांना चॉकलेट ऑफर करतात तेव्हा! 

उदयनराजे हे सौरभ राव यांना चॉकलेट ऑफर करतात तेव्हा! 

पुणे : पुणे महापालिकेत आयुक्त म्हणून सौरभ राव यांनी आज सूत्रे घेतली. ही सूत्रे घेतल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. मात्र एका नेत्याच्या भेटीने आणि त्याने स्वागतासाठी दिलेल्या वस्तूने स्वतः राव हे देखील चकीत झाले. अर्थात ही व्यक्ती होती खासदार उदयनराजे.

उदयनराजे यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये पुणे महापालिकेत एंट्री केली. थेट आयुक्तांचे दालन गाठले. राव यांना शुभेच्छा दिल्या. आधी पुष्पगुच्छ दिला. नंतर कॅडबरी डेअरी मिल्क चॉलकेट राव यांच्या हातात देत "इटस्‌ माय स्टाइल,' असे आपल्या शैलीत सांगितले. "माझं तुमच्याकडं काम नाही. पण तुम्ही चांगले अधिकारी आहात. पुणे जिल्हा उत्तम सांभाळला. आता पुण्यातही चमकदार कामगिरी करा,' अशा भरभरून शुभेच्छा उदयनराजे यांनी दिल्या. 

राव यांनाही डेअरी मिल्क चॉकलेट आवडत असल्याचे राजेंना माहिती होते. त्यामुळेच त्यांनी ते आवर्जून भेट दिले. पुण्याचे जिल्हाधिकारी असल्यापासूनच राव यांच्याशी त्यांचा परिचय झाला होता. हटके भेट देऊन आणि आपली छाप उमटवून उदयनराजे पालिकेतून निघून गेले. राव यांच्या स्वागतासाठी पालिकेत आज बरीच गर्दी झाली होती. त्यात चर्चा झाली ती राजेंच्या भेटीची. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com