udyanraje on kolhaput mutten | Sarkarnama

उदयनराजे : कोल्हापूरकरांचा मटणावर जोर, पण तब्बेत जपा ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

भंडारे हे हॅण्डसम अधिकारी! 
संसद ग्राम अभियानात खासदार उदयनराजेंनी दत्तक घेतलेल्या कोंडवे गावांत विविध विकास कामे राबविण्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे यांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे आम्ही यशस्वी झालो. ते खुपच हॅण्डसम आहेत, त्यांनी चांगले काम केले आहे, असे म्हणत उदयनराजेंनी श्री. भंडारे यांचे कौतुक केले. 

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी सातारा जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO ) यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले अतिरिक्त सीईओ पांडुरंग पाटील हे मुळचे कोल्हापूरचे असल्याने त्यांच्याकडे पाहात उदयनराजेंनी "कोल्हापूरच्या माणसांचा मटणावर जोर असतो. तेथील माणसे मटण खूप खातात, पण तब्येतीला जपा', असा सल्ला आपल्या स्टाईलमध्ये दिला. त्यांच्या या सल्ल्याला उपस्थितांनी हसून दाद दिली. 

खासदार भोसले यांनी शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी माजी सभापती सुनील काटकर, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, फिरोज शेख, बाळासाहेब चोरगे, शिवलिंग दळवी, जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, अनिता चोरगे, भाग्यश्री मोहिते आदी उपस्थित होते. 

उदयनराजे म्हणाले, केंद्राकडे जिल्हा परिषदेचे काही प्रस्ताव असतील तर ते सांगावे. हे मान्य करून आणण्यासोबतच विविध माध्यमातून निधीही उपलब्ध करण्याबाबत सहकार्य केले जाईल. जिल्हा परिषदेतून चांगली काम व्हावित. पण आमच्या सातारा विकास आघाडीच्या सदस्यांची कामे अडवू नका, असा सल्ला त्यांनी दिला. 

 

संबंधित लेख