udyanraje demmands obc quota for marathas | Sarkarnama

इतरांना कमी संख्या असूनही जादा आरक्षण, मराठ्यांना OBC आरक्षणच पाहिजे!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

कागदाच्या एका ओळीवर आरक्षण दिले आहे.

कऱ्हाड (सातारा) : मराठा समाजाला 'ओबीसी'चे आरक्षण मिळाले पाहिजे, अशी ठाम भुमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला आहे, पण एसइबीसी मधून केवळ सवलती मिळतील. संपूर्ण फायदा मिळण्यासाठी 'ओबीसी'चे आरक्षण दिले तर फायदा होईल. इतर समाजाला त्यांची संख्या कमी असूनही जादा आरक्षण दिले. त्यावेळी कोणत्या आयोगाकडे पाठवले नव्हते. कागदाच्या एका ओळीवर आरक्षण दिले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण दिले पाहिजे.

संबंधित लेख