udyanraje bhosale criticise mandal comission | Sarkarnama

मंडल आयोगाच्या माध्यमातून घाणेरडापणा झाला; आरक्षण केवळ मागासवर्गीयांनाच कशाला ? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

सर्व जातीतील आर्थिक दुर्बलांना आरक्षण लागू करावे!

सातारा : तुम्ही आरक्षण हे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्‍लाससाठी आहे म्हणता मग ते सर्वांसाठी होते. त्यामुळे सर्व जातीतील आर्थिक दुर्बलांना आरक्षण लागू करावे. केवळ मागासवर्गीयांनाच कशाला, असा प्रश्‍न साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. 

धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या विविध प्रश्‍नांबाबत शासकिय विश्रामगृहात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी माझा या समाजाला पाठींबा आहेच का नसणार, असा प्रश्‍न करून उदयनराजे म्हणाले, प्रत्येकाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला हवे. मुळात या मंडल आयोगाच्या माध्यमातून एवढा घाणेरडापणा झाला आहे. त्यांनी मागसलेला भाग म्हणजे आरक्षण एवढेच धरले. त्यांनी आरक्षण देताना बॅकवर्ड क्‍लास असे नमुद केले होते. ज्यावेळी तुम्ही इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्‍लास म्हणता त्यावेळी ते सर्वांसाठी लागू होते. मग सर्व जातीतील आर्थिक दुर्बलांना आरक्षण लागू करायला हवे. केवळ मागासवर्गीयांनाच कशाला. आरक्षणावरून लोकांना मारहाण झाली, जीव द्यावा लागला, किती भांडणे झाली. शेवटी आपण पाहतो, या जन्मीचे याच जन्मी फेडावे लागते, असेही त्यांनी नमुद केले.  

संबंधित लेख