udyanraje arrest option | Sarkarnama

उदयनराजेंपुढे एकच पर्याय...अटक ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 जुलै 2017

खंडाळ्यातील सोना अलाइन्स कंपनीच्या मालकाला खंडणी मागितल्याप्रकरणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी उदयनराजेंनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर काल निर्णय होऊन त्यांचा अर्ज फेटळण्यात आला. त्यामुळे उदयनराजेंपुढे स्वत: हून न्यायालयासमोर हजर होण्याचा एकच व्यवहार्य पर्याय शिल्लक आहे. 

सातारा : खंडाळ्यातील सोना अलाइन्स कंपनीच्या मालकाला खंडणी मागितल्याप्रकरणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी उदयनराजेंनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर काल निर्णय होऊन त्यांचा अर्ज फेटळण्यात आला. त्यामुळे उदयनराजेंपुढे स्वत: हून न्यायालयासमोर हजर होण्याचा एकच व्यवहार्य पर्याय शिल्लक आहे. 

ंखंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल चार महिने उदयनराजे संपर्काबाहेर आहेत. केवळ अधूनमधून त्यांचे काही विशेष कारणांनी सातारकरांना "दूर'दर्शन होत आहे. ते साताऱ्यात नसल्याने जिल्ह्याच्या राजकिय वर्तुळातही शांतता आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतही त्यांच्या सातारा विकास आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवकांना इतरांची मदत घ्यावी लागत आहे. उदयनराजेंनी आता नेमकी कोणती भुमिका घ्यावी, यासंदर्भात त्यांच्या निवडक समर्थकांची आज बैठक होणार आहे. यामध्ये स्वत:हून हजर होऊन जामीनावर मुक्तता करून घेणे याचपर्यायाकडे सर्वाधिक कार्यकर्त्यांचा कल आहे. 

सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्याचा पर्याय असलातरी तो व्यवहार्य नाही, असे काहींचे मत आहे. खंडणीचा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी सरकारकडे प्रयत्न करुनही दिलासा मिळालेला नाही. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागून निर्णय होईंपर्यंत चार महिने गेले. इतके दिवस उदयनराजे आणि कार्यकर्त्यांचा संपर्क नाही. त्यामुळे उदयनराजे व समर्थकांचे राजकीय नुकसान होत आहे. उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही, तसा तो सर्वोच्च न्यायालयातही मिळण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे स्वत:हून हजर होऊन जामिनासाठी प्रयत्न करणे, हाच व्यवहार्य पर्याय असल्याची बहुतांश कार्यकर्त्यांची धारणा आहे. 

संबंधित लेख