udyanraje about shambhuraj desai | Sarkarnama

उदयनराजेंचा शंभूराज देसाईंना सल्ला !  

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 ऑगस्ट 2017

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची त्यांच्या "कोयना दौलत' या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. जास्त दग दग करू नका, स्वत:ची काळजी घ्या, असा सल्ला उदयनराजेंनी शंभूराज देसाईंना दिला. 

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची त्यांच्या "कोयना दौलत' या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. जास्त दग दग करू नका, स्वत:ची काळजी घ्या, असा सल्ला उदयनराजेंनी शंभूराज देसाईंना दिला. 

दोन्ही नेत्यांनी साधारण अर्धातास मनसोक्त गप्पा मारल्या. नियोजन समितीच्या निवडणुकीत खासदारांच्या सातारा विकास आघाडीसोबत आमदार देसाई यांनी समझोता केला आहे. येथे जिल्हा परिषद मतदारसंघातून आमदार देसाईंचा एक तर महिला राखीव मधून साविआच्या उमेदवाराला मतदान करण्याचे नियोजन केले आहे. आमदार शंभूराज देसाई हे मध्यंतरी आजारी होते. त्यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी खासदार उदयनराजे खास आमदार देसाईंच्या निवासस्थानी गेले होते. या निमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्याच्या भुवया मात्र, उंचावल्या आहेत. 

संबंधित लेख