उदयनराजे म्हणाले, तुम्ही सगळे माझ्या गॅंगमध्ये असणार आहात; आणि... 

उदयनराजे म्हणाले, तुम्ही सगळे माझ्या गॅंगमध्ये असणार आहात; आणि... 

सातारा : आम्हाला आई वडील मिळाले, तुम्हाला मिळाले नाहीत. पण एकच सांगतो तुमचे आई आणि वडील उदयनराजे आहेत. आय लव्ह यू...मनापासून सांगतो, तुम्ही सर्व माझी मुलं आहात... आय लव्ह यू, असे म्हणतच खासदार उदयनराजे भोसले बालनिरिक्षण गृहातील मुलांपुढे गहिवरले. 

सातारा पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने येथील बाल निरिक्षणगृहातील मुलांना शंभर ब्लॅकेटचे वाटप खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साताऱ्याच्या नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष राजू भोसले, महिला बालकल्याणच्या सभापती सविता फाळके, नगरसेविका सीता हादगे, श्रीकांत आंबेकर, सुनिता पवार, स्नेहा नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सुरवातीला उदयनराजे भोसले यांचा बालनिरिक्षण गृहातील दोन मुलांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ मुलांच्या हस्ते स्वीकारल्यानंतर ते मिश्‍किलपणे म्हणाले, तुम्ही सगळे माझ्या गॅंगमध्ये असणार आहात. यानंतर त्यांच्या हस्ते मुलांना ब्लॅंकेटस्‌चे वापट करण्यात आले. 

मार्गदर्शन करताना उदयनराजे म्हणाले, आयुष्यात फार मोठे व्हा. पण एक खंत वाटते, आम्हाला आई, वडील मिळाले. पण तुम्हाला मिळाले नाहीत. पण कोणीही वाईट वाटून घेऊ नका. तुमची आई आणि वडील उदयनराजे आहेत. मी कधीही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. झालाच तर तो सहन करणार नाही. आय लव्ह यू...ऑल. मनापासून सांगतो, तुम्ही सर्व माझी मुलं आहात, आय लव्ह यू टू, असे म्हणत असतानाच उदयनराजेंना अश्रू आवरले नाहीत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com