udyanraje about magalwar lake issue | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मंगळवार तळे माझ्या मालकीचे, पोलिसांनी वेढा दिला तरी त्यातच विसर्जन करा! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

मंगळवार तळ्यात विसर्जनाची मागणी उदयनराजेंनी अनेक दिवसांपासून लावून धरलेली आहे, मात्र यासंदर्भात न्यायालयाने विसर्जन करु नये, असे म्हटले आहे. जिल्हा प्रशासन न्यायालयाचा आदेश पाळणार आहे. त्यामुळे उदनराजेंची कोंडी झाली आहे. 

सातारा : "ऐतिहासिक मंगळवार तळे हे आमच्या राजघराण्याच्या मालकीचे आहे. त्यामुळे माझ्या मालकीच्या तळ्यात गणेश मूर्ती विसर्जनासाठी कोणाची परवानगीची आवश्‍यकता नाही. पोलिसांनी वेढा दिलातरी तळ्यात विसर्जन होणार आहे. कोण अडवतो ते बघतोच', अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध केला आहे.

उदयनराजे यांनी सातारा शहरातील गणेश मंडळांची तातडीची बैठक पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, सर्व गणेश मंडळांनी ऐतिहासिक मंगळवार तळ्यातच विसर्जन करावे. कोण अडवतो ते बघतोच. गुन्हे दाखल झाले तर माझ्यावर होतील, मंडळावर नाही. सातारच्या जनतेसाठी मी काहीही करायला मागे पुढे बघणार नाही. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर जिल्हा प्रशासन जबाबदार राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख