udyanraje about girish bapat in satara | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

बापटसाहेब आता दिल्लीत या, हवं तर साताऱ्यातून लढा : उदयनराजे 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

उदयनराजेंच्या प्रयत्नामुळे येथे पासपोर्ट कार्यालय सुरू झाले आहे. आता साताऱ्याची फार लोक परदेशात पाठवू नका प्रॉब्लेम येईल, असेही बापट मिश्‍किलपणे म्हणताच एकच हशा पिकला. 

सातारा : 'बापटसाहेब बस्स झाला महाराष्ट्र, तुम्ही आता दिल्लीत या म्हणजे तुमचा जास्त वेळ आम्हाला सहवास लाभेल. तुमची इच्छा असेल तर साताऱ्यातून उभे राहा' अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रीय राजकारणात येण्याचे आवाहन केले. 

इंडिया पोस्टपेमेंट बॅंकेच्या सातारा शाखेचे उद्‌घाटन आज अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरिश बापट यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी खासदार उदयनराजे भोसले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नियोजन समिती सदस्य दीपक पवार, डाक विभागाचे प्रवर अधीक्षक टेकाळे उपस्थित होते. 

गिरिश बापट म्हणाले, या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे आहेत हे समजल्यामुळे मी पुण्याचा कार्यक्रम रद्द करून साताऱ्याच्या कार्यक्रमाला खास आलो. कारण व्यासपीठावर उदयनमहाराजांबरोबर असणे हे भाग्य लागते. मागे अनेक काळात आम्ही एका व्यासपीठावर होतो. मधल्या काळात व्यासपीठावर होतो पण एकत्र नव्हतो. आज यानिमित्ताने महाराज येथे आहेत. मला जुनी पोटनिवडणुक आणि खासदारकीची निवडणूक आठवते. उदयनराजे सोबत असले की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांला उत्साह येतो त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. 

उदयनराजे आपल्या भाषणात म्हणाले, बापट साहेबांच्या येण्यामुळे मन प्रफुल्लीत होते. एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. मी त्यांना गाडीतून येताना त्यांना सांगितले. बस झाला महाराष्ट्र तुम्ही आता दिल्लीत या म्हणजे तुमचा सहवास जास्त लाभेल. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी साताऱ्यातून उभे रहावे, माझी माघार राहिल! 

संबंधित लेख