udyanraje | Sarkarnama

खासदार उदयनराजेंवर खंडणीचा गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 मार्च 2017

सातारा जिल्ह्यातल्या लोणंद येथील सोना अलॅइज कंपनीच्या व्यवस्थापकाला  खंडणीची मागणी आणि मारहाण केल्याप्रकरणी खा.उदयनराजे भोसले सह 9 जणांवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातल्या लोणंद येथील सोना अलॅइज कंपनीच्या व्यवस्थापकाला  खंडणीची मागणी आणि मारहाण केल्याप्रकरणी खा.उदयनराजे भोसले सह 9 जणांवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खा.उदयनराजे याचे खाजगी स्वीय सहाय्यक अशोक सावंत आणि रणजीत माने, सुकुमार रासकर, धनाजी धायगुडे, राजकुमार गायकवाड़, अविनाश सोनवले, महेश वाघुले, ध्यानेश्वर कांबळे, योगेश बांदल यांना अटक करण्यात आली आहे. 18 मार्च ला कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना सातारा सर्किट हाउस येथे खंडणी दिली नाही म्हणून मारहाण केली होती.  यासंदर्भात ९ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 

संबंधित लेख