भाजपच्या गाजरशेतीला मतांचे पाणी देऊ नका : उद्धव ठाकरे

भाजपच्या गाजरशेतीला मतांचे पाणी देऊ नका : उद्धव ठाकरे

राजगुरूनगर : शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुष्काळ पडला आहे, पण राज्यकर्त्यांच्या बाजूने योजना, थापा आणि आश्वसनांचा भरपूर पाऊस आहे. या थापाड्यांच्या गाजराच्या शेतीला आगामी निवडणुकांमध्ये मतांचे पाणी घालू नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले. 

राजगुरूनगरच्या भीमा नदीवरील केदारेश्वरजवळील नवीन हुतात्मा शिवराम हरी राजगुरू पुलाचे उदघाटन, राजगुरूनगर एस टी बस स्थानकजवळील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या स्मृतिशिल्पाचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते झाले. यानिमित्त शिरूर लोकसभा शिवसेना आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, आमदार सुरेश गोरे, नीलम गोऱ्हे, गौतम चाबुकस्वार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, समन्वयक रवींद्र मिर्लेकर आणि जिल्हाप्रमुख राम गावडे, अविनाश राहणे, विजया शिंदे, प्रकाश वाडेकर आदी शिवसेनेचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. 

 उद्धव ठाकरे म्हणाले, ' सध्या दुष्काळ पडला आहे. गरमागरम घोषणा चालू आहेत. पण शेतकऱ्यांची गरमी जर राज्यकर्त्यांना दिसली नाही, तर त्यांची सिहांसने जाळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो, असे म्हटले जाते, पण मी सरकारच्या विरोधात नाही तर शेतकऱ्याच्या बाजूने बोलतो. त्यांना विरोधात वाटत असेल तर आहे विरोधात.  शेतकऱ्यांच्या संपाला पाठींबा देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष होता. शेतकरी मुंबईला लाल निशाण घेऊन मोर्चा घेऊन आले, त्यांचे आम्ही स्वागत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण आम्हाला लाल रंग निशाणाचा नाही तर शेतकऱ्याच्या रक्ताचा दिसला. भाजपावाले गांधींचे नाव कसे घेतात, माहिती नाही. कारण यांनीच २ ऑक्टोबरला दिल्लीत शेतकऱ्यांच्या मोर्चावर लाठीमार केला आणि पाण्याचे फवारे मारले. याला राज्यकर्ते म्हणत नाहीत.' 

 बैलगाडा शर्यती बंद करायच्या असतील तर घोड्यांच्या शर्यतीही बंद करा. भाजपवाले म्हणतात पुढची ५० वर्षे आम्ही येणार आहे. हि ५ वर्षच कशीबशी काढली आहेत, अशी टीका त्यांनी केली. 

खासदार आढळराव, आमदार सुरेश गोरे, रामदास ठाकूर, किरण मांजरे, माऊली खंडागळे आदींची भाषणे झाली. राम गावडे व प्रकाश वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. गणेश सांडभोर यांनी आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com