केंद्र सरकारने जनतेची लक्ष्मी ओरबडून घेतली, आता दिवाळीत लक्ष्मी पुजन कसे करायचे ?  - ठाकरे 

UDDHAV-THAKRE-NARENDRA
UDDHAV-THAKRE-NARENDRA

मुंबई  : "केंद्र सरकारने वस्तु सेवा कराच्या दरात कपात केली. त्या बद्दल त्यांचे अभिनंदन.गुजरात निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर हा निर्णय घेतला.पण, इंधन दरवाढ, महागाई, भारनियमन आहेच. इतके दिवस वसुल केलेला जीएसटी परत करणार का .केंद्र सरकारने जनतेची लक्ष्मी ओरबडून घेतली. आता दिवाळीत लक्ष्मी पुजन कसे करायचे ?",अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका  केली. शिवसेनेमुळेच सरकार हलायला लागले असा दावाही त्यांनी केला.


शिवसेना भवन येथे शनिवारी झालेल्या पत्रकार परीषदेत त्यांनी भाजपवर टिका करताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही चिमटा काढला. जनतेच्या हितासाठी आम्ही सरकार मध्ये आहोत. पण,जिथे गरज आहे तेथे शिवसेना जनतेसोबत राहाणार. असे सांगत सत्तेतून इतक्‍यात बाहेर न पडण्याचे संकेतही त्यांनी दिले. 

जनतेच्या असंतोषाच्या झळा सरकारला बसु लागल्या आहेत. त्यामुळेच जीएसटी कमी करण्याचा निर्णय झाला. यातून व्यापारी खुष झाले असले तरी जनता आजही नाराज आहे. जीएसटी कमी करणे ही दिवाळीची भेट नाही तर हा सरकारचा नाईलाज आहे. व्यापाऱ्यांनी एकजूटीने विरोध करुन सरकारला झुकवले. ही एकजूट महत्वाची आहे.

सरकारने जनतेच्या सयंमाचा अंत पाहू नये असा इशाराही त्यांनी दिला.चांगले काम केले तर कौतुक करु.पण,जनतेसाठी आंदोलनाही करू. आमचा दबाव व्यक्तीगत कारणांसाठी नाही तर जनतेसाठी असतो असेही त्यांनी नमुद केले.

भारनियमन हे कायमस्वरुपी बंद व्हायला पाहिजे.सर्वत्र सत्ता तुमची आहे.मग,कोळसा कमी पडेल हे समजले का नाही?  मंत्रीमंडळात राहून शिवसेनेने अनेक गोष्टी मंजूर करुन घेतल्या आहेत . असेही त्यांनी नमुद केले.तर,रेल्वेच्या पादचारी पुलावरील फेरीवाले हटवण्याचे श्रेयही शिवसेनेचे असल्याचे त्यांनी नमुद केले.शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते.असे सांगून त्यांनी राज ठाकरे यांनाही चिमटा काढला.

मुख्यमंत्र्यांना टोला
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला मुख्यमंत्री उपस्थीत राहाणार आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता,"ते आत्मचरीत्र पारदर्शक असावे.एखाद्यावर काही शिपंडलं तर ते पवित्र होत असा समज झाला असावा.तटकरेंवर केलेले सिंचन घोटाळ्याचे आरोप खोटे होते हे मुख्यमंत्र्यांनी व्यासपिठावरुन जाहीर करावे असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

राणेंनाही टोला 
महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांनी एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.त्यावरुन पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारले . पण उधाण यांनी व्यक्तिगत जीवन मरणाचा प्रश्‍न ज्याचा त्याने सोडवावा.मला नागरिकांच्या जीवन मरणाच्या प्रश्‍नाची चिंता आहे ,असा टोला त्यांनी लगावला.मात्र,राणेच्या मंत्रीमंडळातील प्रवेशानंतर सत्तेतून बाहेर पडण्यावर विचारलेल्या प्रश्‍नाला  त्यांनी बगल दिली.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com