Udhhav Thakray taunts prime minister Narendra Modi | Sarkarnama

यंदा 15 आॅगस्टला देशाला उद्देशून जे काही बोलाल ते खरं बोला : उध्दव ठाकरेंचा मोदींना टोला

संजय मिस्कीन
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मराठी चित्रपटातील नामवंत कलाकर सुबोध भावे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उध्दव ठाकरे यांनी भाषण करत असताना याची घोषणा करत भावे यांचे स्वागत केले. 

मुंबई : " अच्छे दिनचं स्पप्न दाखवणारे सरकार फक्त बोलघेवडेपणानं कार्यरत आहे. देशातली जनतेला रेशनची काळजी असताना हे सरकार मात्र ‘वन नेशन वन इलेक्शन’च्या प्रयत्नात आहे.   यंदा 15 आॅगस्टला देशाला उद्देशून जे काही बोलाल ते खरं बोला,"अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मार्मिक या साप्ताहिकाच्या 59 व्या वर्धापनदिनी ते बोलत होते. 

देशात व राज्यात सध्या अस्वस्थतेचं वातावरण आहे. असे स्पष्ट करताना ते म्हणाले की," मराठा व धनगर समाज न्याय अधिकारासाठी रस्त्यावर उतरला आहे. हे समाज इतके का आक्रमक झालेत याचे उत्तर सरकारकडे आहे काय ? केवळ आश्वासने देत या सरकारने भ्रमाचा भोपळा तयार केला आहे. याच भ्रमावर सरकारचा बोलघेवडेपणा सुरू आहे  ."

" इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती व त्यानंतरच्या निवडणूकांत इंदिरा गांधीना पर्याय काय असा सवाल केला जात होता. पण देशातल्या जनतेनं पर्याय न पाहता बलशाली इंदिरा गांधीचा पराभव केला. अाताही दुसरी आणीबाणी लादली जातेय की काय अशी स्थिती असून एकदिलानं या आणीबाणीचा पराभव करण्यास पुढे या," असे आवाहनही उध्दव ठाकरे यांनी यावेळी केले. 

 

 

संबंधित लेख