udhhav thackrey's pandharpur tour | Sarkarnama

'शरयु'नंतर उद्धव ठाकरे करणार 'चंद्रभागे'ची महाआरती

भारत नागणे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

येत्या 24 डिसेंबररोजी येथील चंद्रभागा एसटी बसस्थानक मैदानावर ही सभा होणार आहे.  

पंढरपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 24 डिसेंबर रोजी सोमवारी दुपारी एक वाजता चंद्रभागा मैदानावर  जाहीर सभा होणार आहे. सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे चंद्रभागेची महाआरती करणार आसल्याची माहिती संयोजक आमदार तानाजी सावंत व प्रा.शिवाजी सावंत यांनी दिली. 
  
पंधरा दिवसांपूर्वीच पक्ष प्रमुख  उध्दव ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी अयोध्देत जाऊन दर्शन घेतले होते.त्यानंतर शरयु नदीची महाआरती केली होती. अयोध्देच्या दौऱ्यानंतर ठाकरे यांनी पंढरपुरात सभा घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार येत्या 24 डिसेंबररोजी येथील चंद्रभागा एसटी बसस्थानक मैदानावर ही सभा होणार आहे.  

संबंधित लेख