उद्धव ठाकरे आव्हाडांना टाळी देत म्हणाले, आंघोळ करून आलोय!

आमच्याकडे पाणी आहे, अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी मारली..
उद्धव ठाकरे आव्हाडांना टाळी देत म्हणाले, आंघोळ करून आलोय!

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानभवनात येणार म्हणून शिवसेनेचे अनेक आमदार पायऱ्यांवर स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन थांबले होते. मात्र शिवसेनेच्या नेत्यांऐवजी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड पुढे आले आणि त्यांच्याकडील पुष्पगुच्छ घेऊन उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले, त्याकडे शिवसेनेचे आमदार पाहत राहिले.     

एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या जवळ जाऊन आज मी आंघोळ करून आलो असल्याची कोपरखळी मारत जितेंद्र आव्हाड यांना टाळी देत जोरदार हसले. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या बंगल्यावरील पाण्याचे बिल थकित आहे. त्यावर आज सकाळी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला होता की मुख्यमंत्र्यांचं पाणी कट करू नका. कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना पाणी कमी पडू नये. नाही तर राज्यातील विकासकामांना उशीर होईल.  हवं तर त्यांचं पाणी बिल मी भरतो असा टोमणा आव्हाड यांनी मारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तो धागा पकडत मी अंघोळ करून आलो आहे. आमच्याकडे पाणी आहे, अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी मारली...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com